SÛleÛjpÙele

Thursday, September 9, 2010

टेरी जोन्स, अमेरिका आणि आपण

'अमेरिका हा अतिप्रगत देश आहे. ती जगातील एकमेव महासत्ता आहे. तेथील लोक प्रगल्भ आहेत ', असं सर्वसाधारणत: मानल जात आलं आहे. न्यूयॉर्क, बोस्टन किंवा लॉस एंजलिस व इतर शहरं आणि अमेरिकी प्रसार माध्यमं यांच्याकडं बघून असं मत बनवलं जातं. प्रत्यक्षात जी खरी अमेरिका आहे, तेथील लोक अज्ञानी, अंधश्रध्दाळू, धर्माभिमानी व वांशिक श्रेष्ठत्वाची भावना जपणारेच आहेत.
न्यूयॉर्कवरील हल्ल्याला नऊ वर्षे 11 सप्टेंबरला पुरी होत असताना कुराण जाळण्याचा आपला इरादा टेरी जोन्स या धर्मोपदेशकानं जाहीर केल्यावर जगभर जी चर्चा होत आहे, त्यात हे वास्तव पुरं डोळयाआड केलं जात आहे.
टेरी जोन्सच्या या कृत्याचा अमेरिकेत निषेध होत असला आणि त्याच्या मागं 40_50 लोकच असले, तरी त्याचं हे कृत्य पराकोटाचं टोकाचं असल्यानं ही टीका होत आहे, पण तो व त्याच्यासारखे इतर असंख्य ज्या मतप्रवाहाचं प्रतिनिधित्व करतात, तो खूप व्यापक आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. इव्हॅजेलिकल ख्रिश्चन गौरवर्णीय वर्चस्ववादाचा मोठा प्रभाव अमेरिकेत आहे. याच प्रभावामुळं अगदी 9।11 घडून व इराकवरील हल्ल्याबाबत टीका होऊनही जॉर्ज बुश दुसऱ्यांदा निवडून आले होते. त्यांच्यावर टीका होते आहे, हे सर्वसामान्य अमेरिकनाचं मत आहे, असं मातलं गेलं; कारण न्यूयॉर्क वा इतर मोटया शहरातील बुध्दिवाद्यांच्या मतांचं प्रतिबिंब प्रसर माध्यमांत पडत होतं आणि त्यांची मतं ही प्रसार माध्यमं जगभर पसरवत होती. त्यामुळं बुश हरणार असं चित्र उभं राहिलं. प्रत्यक्षात ते वस्तुस्थितीपेक्षा अगदी विपरीत होतं.
गौरवर्र्णींन वर्चस्ववाद्यांचा व धार्मिक भावनांचा अमेरिकेत किती पगडा आहे, हे बुश यांच्या कारकिर्दीतील एका प्रकरणानं दर्शवलं होतं. एक महिला दुर्घर आजारानं मृत्यूशय्येवर होती. ती जगणं शक्य नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळं तिच्यावरील उपचार थांबवून शांतपणं तिला मृत्यूला सामोरं जाऊ द्यावं, असं तिच्या पतीचं म्हणणं होतं. पण इत्पितळातील काही डॉक्टरांना हे मान्य नव्हतं. ईश्वरानं जन्माला घातलं असल्यानं, त्यानं प्राण काढून घेतल्याविना इतर कोणत्याही प्रकारे मृत्यू होता कामा नये, अशी त्यांची भावना होती. त्यांनी त्या महिलेच्या पतीची विनंती नाकारली. हे प्रकरण न्यायालयात गेलं. तेथे पतीच्या बाजूनं निकाल लागला. पण अशा प्रकारच्या मृत्यूला विरोध करणाऱ्या धर्मवादी गटांच्या प्रभावाखाली जॉर्ज बुश यांनी 48 तासांत देशाच्या सिनेटची बैठक बोलावली व न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवणारा बदल कायद्यात केला आणि त्याला अध्यक्षीय संमतीही देऊन टाकली. अशाच धर्मवादी गटांचा गर्भपातलाही विरोध आहे. त्यामुळं गर्भपाताची सोय असलेल्या रूग्ग्णालयांवर अनेकदा बॉम्बहल्लेही झाले आहेत. जिहादी दहशवादाची सुरूवात होण्याआधीच अमेरिकेच्या ओक्लाहोमा या शहरातील एक सरकारी इमारत बॉम्बस्फोटानं उडवून दिली गेली होती. त्यामागं गौरवर्णीय वर्चस्ववाद्यांचा हात होता. या घटनेतं 100 पेक्षा अधिक अमेरिकी नागरिक मारले गेले होते.
हे सगळं बघितल्यावर टेरी जोन्सचं कृत्य अतिरेकी असलं, तरी तो जी इव्हॅनजेलिकल गौरवर्णीय ख्रिश्चन वर्चस्वाची भावना बोलून दाखवतो, त्याला अमेरिकी जनतेत पाठिंबा आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळंच 9।11 जेथे घडलं त्या जमीनदोस्त झालेल्या वर्ल्ड ट्रेट सेंटरच्या इमारतीजवळ मशीद बांधण्याचा प्रस्तावाला विरोध होत आहे. ओबामा यांनाही त्याची दखल घेऊन आपली भूमिका बदलावी लागली. 9।11 घडून येण्यास मुस्लिम जबाबदार आहेत, ही सर्वसामान्य अमेरिकी जनतेची भावना आहे. याच जनतेतून पोलिस, सरकारी अधिकारी वा लष्करातील जवान व अधिकारी येतात. निरपराध मुस्लिमांना वा हरीप्रसार या भारतीयासारख्या एखाद्या बिगर मुस्लिमाला विमानतळावर जो त्रास होतो, त्यामागं ही भावना आहे, हे आपण क्वचितच लक्षात घेतो.

2 comments:

  1. गोरे, इंग्रजी बोलणारे आणि श्रीमंत लोक म्हणजे प्रगत हा आपला कायमचा न्यूनगंड आहे. अमेरिकेत दुस-या महायुध्दाच्या काळातील ज्यूविरोधी वातावरणाचं स्वतः ज्यू असलेल्या आर्ट बुकवाल्डनं त्याच्या आत्मचरित्रवजा पुस्तकात लिहिलंय. आणखीही अनेक मोठमोठे दाखले असतीलच... भारतानं १९४७ मध्ये घटनेनं सर्वांना समान हक्क दिले. अमेरिकेत १९६० च्या दशकातसुद्धा काळ्यांविरुद्धचा हिंसाचार चालू होता.... ओबामा अध्यक्ष झाल्यावर ज्या रीतीनं स्वतःकडेच (आपण केवढा पराक्रम केला असं म्हणून) विस्मयानं पाहण्याची जी काही प्रतिक्रिया आली तीही अमेरिकन लोकशाहीतली भोकं दाखवणारीच होती... पण गंमत म्हणजे आपणही त्या सर्वांमध्ये सामील होऊन अमेरिकनांचं कौतुकच केलं..
    राजेंद्र साठे

    ReplyDelete
  2. At the root of American Evangelical white racism is the interpretation of Bible and the hope of the ' promised land' exclusively for white Christians. Evangelicals also get funding and support from the Jewish lobby as they both deny Palestinian rights and asset Jewish right to Israel. So again the faultline of American racism and the issue of Israel are linked.

    Btw, I watched closely the Terry Shivo case that you have mentioned in the blog. The fight was not only about the religious interpretation of death, but was about the insurance money involved. Terry Shivo's death was endlessly discussed and it was interesting to see how Jesse Jackson and Bush were actually on one side.(http://www.pajamahadin.com/?p=913)

    Racism in the United States is very deep. Obama's election was celebrated on that backdrop. Though he is a poster-boy, his colorful presence gave hopes to the millions.

    ReplyDelete