SÛleÛjpÙele

Tuesday, August 31, 2010

पवारांचा पलटवार

काही बोलण्यासाठी किंवा कृती करण्यासाठी योग्य मोका साधणं, हे राजकारणातील एक महत्वाचं कौशल्य असतं. शरद पवार यांच्याकडं हे कसब आहे, याचा पुरेपूर प्रत्यय त्यांनी अनेकदा आणून दिला आहे. पण अलीकडच्या काळात पवार आपला हा 'शुअर टच' गमावून बसले आहेत की काय, असं वाटू लागलं होतं. पण पक्षाच्या कार्यकत्यांच्या बैठकीत इतर अनेक विषयावर बोलताना त्याच ओघात पवारांनी महाराष्ट्रताील विरोधी पक्षनेत्यावर शरसंधान केलं. हे नेते बिल्डरांवर विधानसभेत आरोप करतात आणि नंतर त्यांच्याशी तोडपाणी करतात, असं पवार म्हणाले.
...आणि हे विधान करण्यामागं पवार यांचा जो मुख्य उद्देश होता, तो लगेचच साध्य झाला.
या मुद्यावर आता गदारोळ उडणार, हे त्यांना अपेक्षित होतं. त्यावर प्रसार माध्यमांत चर्चा होत राहणार, हेही ते जाणून होते. या आरोपाचं खंडन करण्यात विरोधी पक्ष गुंतून पडणार, हेही पवार जाणून होते.
झालंही तसंच आणि पवारांना नेमकं तेच हवं होतं.
...कारण गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा लवासा प्रकल्पाचा मुद्दा गाजू लागला होता आणि तो तसा गाजवण्यामागं काँग्रेसचा हात होता. नारायण राणे यांच्याकडील महसूल खात्यात असलेला एक अहवाल पुन्हा बसनातून काढण्यात आला होता. हा विषय काँग्रेसमधील एक गट आपल्याला लक्ष्य करण्यासाठी उठवत आहे, त्यांची विरोधी पक्षांशी हातमिळवणी आहे, हे पवार जाणून आहेत. शिवाय गेल्या दोन विधानसभा अधिवेशनात भूखंडांची ज्या प्रकरणवरून आराेंप झाले, त्यातील काही बषाल्डर हे पवारांच्या गोतावळयातील आहेत. या आरोपांमागचा खरा उद्देश हा आपल्याला लक्ष्य करण्यााा आहे, याकडं पवार कसे डोळेझाक करतील? आपल्याच पक्षातील काही मंत्री व नेतेही या रणनीती अप्रत्यक्षपणं सामील आहेत, हेही पवारांना माहीत आहे. पण काँग्रेसवर सरळ हल्ला चढवणं त्यांना नको होतं. तेव्हा पवारांनी विरोधी पक्षांवरच रोख ठेवला आणि सगळया चर्चेचा पटच बदलून टाकला. पवारांनी हा 'सिग्नल' दिल्यावर त्यांचे चेले सर्व वृत्तवाहिन्यांवरील चर्चात तीच 'री' ओढत राहिले आणि त्यांना उत्तर देण्यात भाजपा व सेना नेते गुंतून पडले. 'लवासा'चा प्रश्न मागे पडला.
या सदंर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, 'पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा' हे जे दुष्टचक्र आपल्या देशात तयार झालं आहे, त्यातील शरद पवार हे एक आघाडीचे भिडू आहेत. बाकी सगळं ते चालवून घेऊ शकतात. पण सत्ता आणि पैसा यातील हितसंबंधाना धक्का लावण्याचा कोणी प्रयत्न केल्यास पवार अत्यंत निर्घृणपणं तो मोडून काढतात. 'लवासा' हा पैशाचा प्रश्न आहे. हे पवार कसं खपवून घेतील? ते पलटवार करणारच होते. फक्त त्यांच्या सोईनं, त्यांच्या पध्दतीनं त्यांनी तो केला एवढंच.
आता पवार यांचे विरोधक त्यांच्यावर प्रतिवार करण्यात गुंतून पडले आहेत आणि पवार मजा बघत बसणार आहेत.
...कारण पवार यांनी जो आरोप केला, त्यात तथ्य आहेच. केवळ काँग्रेस व राष्ट्रवादीच नव्हे, तर भाजपा व सेना यांचंही बिल्डर लॉबीशी साटंलोटं चांगलंच घट्ट आहे. किंबहुना राज्यकारभारावर बिल्डर लॉबीची पकड आहेच.
त्यामुळं विरोधकांना विश्वासार्हता नाही, हे पवार यांना ठाऊक आहे. त्याचाच ते फायदा उठवत आहेत.

No comments:

Post a Comment