SÛleÛjpÙele

Tuesday, August 31, 2010

दहशतवादाला रंग असतोच

एखादी समस्या निर्माण झाली की, रोखठोक व पारदर्शी पध्दतीने प्रामाणिकरीत्या चर्चा व संवाद घडवून आणायाचा आणि सर्वमान्य तोडगा काढायचा, ही खरी असते लोकशाही राज्यव्यवस्थेतील रीत. मात्र गेली 60 वर्षे लोकशाही राज्यव्यवस्था राबवण्याचा अभिमान मिरवताना आपण ही रीत पार विसरून गेलो आहोत. वितंडवाद आणि विसंवाद ही आपल्या लोकशाहीतील आता प्रमुख वैशिष्टय बनली आहे. प्रश्न कोणताही असो, आपण मुद्याला भिडतच नाही. हा प्रश्न सोडविण्याऐवजी नुसती अटीतटी निर्माण करून आणि त्याद्वारे जनभावना भडकावून आपलं कुरघोडीचं राजकारण कसे साधता येईल, इताकच कोता विचार केला जाऊ लागला आहे. परिणामी देशाला भेडसावरणाऱ्या अनेक बिकट समस्या या सत्तेच्या साठमारीतच्या राजकारणात अडकून अधिकच बिकट बनत गेल्या आहेत.
याचं ताजं उदाहरण आहे, ते 'भगवा दहशतवा' या केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केलेल्या विधानाचं.
गृत्रहमंत्र्यांच्या या विधानामुळं संसदेत गदारोळ माजला. भाजपा व शिवसेननं चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. वाद वाढला, तसं 'दहशतवादाला कोणताही रंग नसतो, दहशतवाद हा दहशतवाद असतो', अशी भूमिका घेऊन काँग्रेसनं गृहमंत्र्यांनाच एकटं पाडलं. मग वृत्तवाहिन्यांवर चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालं आणि 'दहशतवादाला रंग नसतो', हेच पालूपद प्रत्येक जण म्हणू लागला.
खरं तर दहशतवादला रंग नसतो, हा मुद्याच बोगरस आहे. भारतात जे दहशतवाद 1978 नंतर पसरत गेला आहे, तो धर्माधिष्ठितच होता, हे नाकारण्यात काय हशील आहे? खलिस्तानी दहशतवाद हा शीख पंथाच्या एकांतिक व अतिरेकी विश्लेषणावर आधारित होता. भिन्द्रनवाले व त्याचे साथीदार याना शिखांसाठी स्वतंत्र 'खलिस्तान' स्थापन करायचं होतं. त्यामागची प्रेरणा ही धार्मिकच होती. सर्व शीख पंथीयांना ती मान्य नसली, तरी भिन्द्रनवाले याचं शीख पंथाचं विश्लेषण अयाोग्य आहे, असं भले भले शीख बुध्दिवादी म्हणायला तयार नव्हते. अपवाद फक्त खुशवंत सिंह यांचा. त्यांनी पहिल्यापासूनच भिन्द्रनवाले हा अडाणी व मूर्ख माणूस आहे, अशी सडेतोड भूमिका घेतली होती. पण सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईनंतर खुशवंत सिंह यांनी त्यावर कडक टीकाही केली. 'भिन्द्रनवाले चुकत असेल, पण त्यानं उपस्थित केलेल्या मुद्यांचं काय', असा सवाल बहुतेक शीख बुध्दिवंत विचारत राहिले होते.
या दहशतवादाचा रंग भगवाच होता.
त्यानंतर काश्मीरमध्ये व पुढं देशाच्या इतर भागांत पाक पुरस्कृत दहशतवाद पसरत गेला. अफगाणिस्तानातून सोविएत फौज परत गेल्यावर या दहशतवादाला 'जिहादी' ष्वरूप येत गेलं आणि पुढं 9।11 च्या न्यूयॉर्क येथील हल्ल्यानंतर तर हा दहशतवाद पूर्णपणं जिहादीच बनला. ओसामा_बिन--लादेन किंवा मुल्ला ओमर अथवा ल्ष्कर_ए_तय्यबाचा सईद यांनाजगभरात इस्लामी राज्य आणायचं आहे. त्यांना जगभर शरियतचा काया लागू करायचा आहे. त्यासाठी मुस्लिम नसलेल्या काफिरांच्या विरोधात त्यांनी जिहाद पुकारला आहे. इस्लामचं हे चुकीचं विश्लेषण आहे. पण तसं उघडपणं अलीकडं काही बुध्दिवंत म्हणू लागले आहेत. पण इतकी वर्षे कोणीही इस्लामी धर्मवेत्ते ओसामा-बिन_लादेनला खोटं ठरवायला तयार नव्हते. तो म्हणत असलेली जिहादीची संकल्पना इस्लामच्या धर्मशास्त्रात बसत नाही, असं खणखणीतपणं कोणी म्हणत नव्हतं. आताशाच काही जण तसं सांगू लागले आहेत. भूमिका घेतली जात होती, ती' 'तो उठवत असलेल्या मुद्यांचं काय' हीच.
या दहशतवादाचा रंग हिरवाच होता व आहे.
उरलला प्रश्न 'भगव्या दहशतवादा'चा.
चिदंबरम असं म्हणाल्यामुळं त्यांनी समस्त हिंदू समाजाचा अपमान केला आहे, असा आरोप होत आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा द्याला हवा, अशी मागणी केली जात आहे. पहिली गोष्ट म्हणजे नांदेड. परभणी, गोवा, ठाणे, हैदराबाद, अजमेर इत्यादी ठिकाणी ज्या दहशतवादी घटना घडल्या आणि त्या बद्दल ज्या लोकांना पकडण्यात आले आहे, ते हिंदू असले, तरी त्यांची प्रेरण ही हिंदुत्ववादी विचारसरणी हीच आहे. हिंदू धर्म आणि हिंदुत्व या दोन वेगवेगळया गोष्टी आहेत. हिंदुत्व ही राजकीय विचारसरणी आहे. हिंदू र्ध्मा सर्वसमावेशक आहे, तसं हिंदुत्व नाही. हिंदू धर्म ही जीवनप्रणाली आहे, पण हिंदुत्व ही नव्हे. आपल्याकडे पध्दतशीरपणं बुध्दिभैद केला जात आला आहे की, सर्वोच्च न्यायालयानं हिंदुत्व ही जीवनप्रणाली असल्याचं मान्य केलं आहे. वस्तुत: सर्वोच्च न्यायालयानं हिंदू धर्माबाबत हे विधान केलेलं आहे. पण हिंदू धर्म म्हणजेच हिंदुत्व असं ठसवण्यासाठी हा खोटारडेपणा केला जात आला आहे. हिंदुत्वाची ही जी विचारसरणी आहे, तिचा पाया हा एकजिनसी समाज व्यवस्थेचा आहे. म्हणूनच सावरकरांनी 'पुण्यभू व पित्रभू' अशी मांडणी केली. इतिहासाच्या एका विशिष्ट पध्दतीच्या विश्लेषणावर हिंदुत्वाचा सगळी पायाभरणी झाली आहे. भारतातवर परकीय आक्रमणं झाली, ती हा समाजा विखुरलेला असल्यलानं आणि त्यामुळं स्वत्व गमावून बसल्यानं. त्याासाठी समाज एकजिनसी हवा आणि त्यानं सर्वार्थानं बलिष्ठ व्हायला हवं, असा तोडगा सुचलला गेला. सावरकराचा जातिव्यवस्थेला व अंध्ग्ध्दांना विरोध होता, तो त्यासाठीच. आधुनिकतेवरचा त्यांचा भरही त्याच उद्दिष्टापोटी होता. म्हणूनच जातीपातीच्या विरोधात असलेल्या सावरकरांना आंतरधर्मीय विवाह मान्य नव्हते. समाजा एकजिनसी असण्याच्या ते विरोधात जातं यासाठीच. या देशात हिंदू हे बहुसख्य असल्यानं भारत हा हिंदूंचाच आहे, इतरांना येथे राहता येईल, पण ते विशिष्ट मर्यादेतच, अशी त्यांची भूमिका होती. या पयावर त्यांना नवा भारत घडवायचा होता आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्यााची किंवा कोणतेही व कितीही कष्ट उपसायची अथवा त्याग करायची त्यांची तयारी होती. गांधीजीची हत्या झाली, तिचं कारण नेमकं हिंदू धर्म व हिंदुत्वातील फरक हेच होतं. महात्माजी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणून घेत असत. वस्तुत: हिंदू धर्म व हिंदुत्व एकच असतं, तर हिंदू धम पाळणाऱ्या महात्माजींचा खून करण्याचं सावरकरांचा अनुयायी असलेल्या नथुरामला काही कारणच नव्हतं. तरीही नथुरामनं गांधीजींचा खून केला, तो खरा हिंदू धर्म काय आहे, ते आपल्या उक्ती व कृतीतून दाखवून देणारे महात्माजी हिंदुत्ववाद्यांना अडचणीचे ठरत होते. हे जे हिंदुत्व होतं, ते संघानं नंतर रणनीतीचा भाग म्हणून त्यातल अतिरेकाचा भाग थोडा वगळून स्वीकारलं. मात्र गाभा तोच राहिला आहे. गुजरातसारख्या घटनांनी त्याची प्रचिती आणून दिली जात आली आहे.
मात्र हा अतिरेकी प्रवाह हिंदुत्वाच्या मुख्य प्रवाहाच्या परिघावरच तसाच राहिला. आज अभिनव भारत किंवा सनातन प्रभात अथवा रामसेनेच्या रूपानं तो दृश्य स्वरूपात प्रकट होत असतो.
या दहशतवादाचा रंग भगवाच आहे.
जर 'सर्व दहशतवादी इस्लामी असतात, पण सर्व इस्लामी दहशतवादी नसतात', असं आपण सरसहा म्हणत असू, तर 'अशा घटनांत हात असलेले सर्व दहशतवादी हिंदू असतात, पण सर्व हिंदू दहशतवादी नसतात', असं कोणी म्हटलं तर हरकत घ्यायचं काय कारण आहे? जिहादी दहशतवादाची कारण इस्लामध्येच आहेत, असं जर आपण मानत असलो, तर अशा हिंदुत्ववादी दहशतवादाची कारणं त्या विचासरणगीतच आहेत, असं मानल्यास आक्षेप कसा काय घेता येईल? मुस्मिल बुध्दिवंतापैकी अनेक जिहादी दहशतवादाबाबत बोटचेपी भूमिका घेत आले आहेत, म्हणून जर दोष द्यायचा असेल, तर हिंदुत्ववादी दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांना तोच न्याय का लावायचा नाही?
एक गोष्ट स्पष्टपणं लक्षात ठेवायला हवी की, जिहादी असो वा हिंदुत्ववादी वा खलिस्तानी, दहशतवादाला धर्माचाच आधार होता व आहे. फक्त असा आधार घेणारे धर्माचं आपापल्या परीनं विकृत विश्लेषण करीत आले आहेत. जसं भिन्दनवाले व त्याचे साथीदार शीख पंथाचे आपल्याला सोईचं ठरणारं विश्लेषण करीत असत. तीच गोष्ट जिहादींची आहे आणि तेच हिंदुत्ववाद्यांबाबत म्हणता येईल. शीख, इस्लाम वा हिंदू हे धर्म पाळणाऱ्या बहुसंख्यांना हे विश्लेष्ण मान्य नव्हतं व नाही. त्या दृष्टनिं हे दहशतवादी अल्पमतातच असतात. तरीही त्यांचा प्रभाव राहतो व अधून मधून वाढतो, तो खऱ्या खोटया गोष्टींची बेमालूम मिसळण करून ते सर्वसामान्यांचा बुध्दिभेद करीत असतात म्हणून.
दहशतवादाच्या विरोधात लढण्याच्या गप्पा मारणारा काँग्रेस पक्ष सत्तेच्या राजकारणाच्या सोईसाठी प्रश्नाला भिडण्याऐवजी बोटचेपी भूमिका घेऊन आपल्याच गृहमंत्र्यांना एकटं पाडत आहे. जिहादी दहशतवादाबाबत काँग्रेस असंच वागत असल्यानं मग चिदंबरम यांनी 'भगव्या दहशतवादाचा' मुद्दा काढल्यावर सेनेला अफझल गुरूचा प्रश्न पुढं सरकवता येतो. मग मूळ दहशतवादला तोंड देण्याचा देशहिताचा मुद्दा मागं पडून सत्तेचं कुरघोडी करण्याचं राजकारण सुरू होतं.
तेच आज 'भगव्या दहशतवादा'च्या वादत होत आहे.

No comments:

Post a Comment